महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - बेलगाव येथे दरोडा

वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात एका शेतातील वस्तीवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोड्याच्या या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Robbery
औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा

By

Published : Jan 21, 2020, 2:37 PM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात शेतातील वस्तीवर अज्ञातांनी दरोडा टाकला. रमैय्यानगर वस्ती येथे हा दरोडा पडल्याची घटना घडली. घरातील सर्व सदस्य झोपले असता, चोरट्यांनी चाकू आणि लोखंडी रॉड यांच्या धाकाने हा दरोडा टाकला.

औरंगाबादमधील बेलगाव शिवारात दरोडा

हेही वाचा... 'साईबाबांनी जन्म कुठे घेतला, यापेक्षा मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्वाचे'

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलगाव शिवारातील रामैय्यानगर वस्तीवर राहणारे शेख शरीफ अनवर यांच्या घरावर हा दरोडा पडला. अनवर यांचे कुटुंब नेहमीप्रमाणे घरात झोपले असता अज्ञात चोरट्यांनी रात्री बाहेरून आवाज देत दरवाजा उघडायला लावला. त्यानंतर घरात प्रवेश करुन चाकू व लोखंडी राॅडचा धाक दाखवत, मारहाण करत घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

हेही वाचा... राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयांत मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

यावेळी चोरट्यांनी शरीफ अन्वर शेख यांच्याकडे आलेले पाहुणे पिरन पिंजारी (65) यांच्या पायावर रॉड मारल्याने त्यांचा पाय मोडला. तसेच चोरट्यांनी अनवर यांच्या शेजारील घरातही दरोडा टाकला. रामा राशिनकर असे या शेजारच्यांचे नाव असून, त्यांच्या घरातून एकुण सत्तावीस हजारांचा मुद्देमाल लुटून नेण्यात आला. चोरट्यांनी दोन्ही दरोड्यात एकूण ६७ हजार ३०० रुपयांचा माल लंपास केला आहे.

हेही वाचा... दुधाच्या भुकटीवरील आयात शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव, अमूलने केला 'हा' आरोप

या घटनेची माहिती मिळताच रात्री डिवायएसपी गोपाळ राजनकर व वैजापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चोरट्यांचा शोध सुरू आहे. तसेच जखमींवर वैजापूर येथील उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details