औरंगाबाद - मंगळवारी रात्री सिल्लोडमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन कापसाच्या जिनिंग, एक शाळा, व देशी दारूचे दुकान फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करतानी कैद झाले आहेत. सध्या या घटनेमूळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सिल्लोड मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; तीन जिनिंग, शाळा, दारू दुकान फोडून लाखोंची रोकड लंपास. - चोरट्यांचा धुमाकूळ
सिल्लोडमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन कापसाच्या जिनिंग, एक शाळा, व देशी दारूची दुकान फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली. यामुळे गावात सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आले. सदर घटना ही सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस फुटेजच्या आधारावर चोरट्यांच्या शोध घेत आहेत.
सिल्लोड शहराला लागूनच असलेल्या डोंगरगाव भागात कापसाच्या अनेक जिनिंग आहेत. या जिनिंगमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत हरीओम जिनिंग, पुनीत इंटरप्राइजेस, शिवम जिनिंग या तीन जिनिंग मध्ये चोरी केली. त्यामधील पुनीत इंटरप्राइजेस मधून १० लाख रुपये रोख, व शिवम जिनिंग मध्ये ठेवलेले ४ लाख ३७ हजार रुपये लंपास करण्यात आले आहे. तर हरी ओम जिनिंग मधून १ लाख रुपये रोख, अशी सुमारे १५ लाखांची रोख रक्कम चोरट्यांनी लूटली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून या तीनही जिनिंग ची माहिती घेण्यात येत आहे.
लाखोंची लूट केल्यानंतर चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर, त्यांनी जवळच असलेल्या प्रगती नॅशनल शाळा, व देशी दारूचे दुकान देखील फोडले. या मधून किती रक्कम चोरी झाली हे आत्तापर्यंत स्पष्ट झाले नाही. मात्र, एकाच रात्री अशाप्रकारे अनेक ठिकाणी चोरट्यांनी लाखो रुपयांची लूट केल्याने गावकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक गुन्हेशाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. सहा ते सात चोरटे जिनिंग च्या सीसीटीव्हीत कैद झाले असून फुटेज च्या आधारावर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.