औरंगाबाद- देवळाईतून एटीएम लंपास केले त्यानंतर पाडेगाव येथे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना शेनपुंजी रांजणगावात अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. पाच दिवसातील ही औरंगाबादेतील तिसरी घटना आहे.
रांजणगावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पाच दिवसातील तिसरी घटना
औरंगाबादेतील शेनपुंजी रांजणगावात अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. पाच दिवसातील ही औरंगाबादेतील तिसरी घटना आहे.
२५ लाख रुपये रोकडने भरलेले एसबीआयचे अख्खे एटीएमच चोरट्यांनी शनिवारी देवळाई भागातून लंपास केले होते. त्यानंतर चोवीस तासातच पाडेगाव येथील एसबीआयचेच एटीएम गॅस कटर ने फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या घटनेला तीन दिवस उलटत नाहीत तर पुन्हा एकदा असाच एक प्रकार वाळूज औद्योगीक वसाहतीत घडला. वाळूजमधील शेनपुंजी रांजणगाव भागात असलेल्या अॅक्सिस बँकेचे एटीएम मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न झाला. एटीएमचे लॉक तोडता न आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
त्यानंतर पोलीस आयुक्तांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करत असून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.