छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -रिक्षा चालकाने एकटी मुलगी पाहून गाडी पळवली, ती ओरडत होती मात्र, तो थांबत नव्हता. ऐन वेळी वडील दिसले मुलीने स्वतःची सुटका करून घेतल्याची क्कादायक घटना वाळूज परिसरात घडली. घटनेनंतर नागरिकांनी चालकाला मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली असून आता पर्यंत ही तिसरी घटना शहरात उघडकीस आली.
अशी घडली घटना :वाळूज औद्योगिक वसाहतीत 16 वर्षीय मुलगी एका कंपनी जवळून रिक्षात बसली. तिला एकटी बघून रिक्षा चालक 7 ते 8 किलोमीटर रिक्षा घेऊन गेला. तिला जायचे त्या ठिकाणी न जाता इतरत्र गाडी भरधाव घेऊन गेला. रिक्षाच्या दोन्ही बाजूंनी त्यांने दरवाजा बंद करुन घेतला होता. मात्र, मुलगी ओरडत होती. ती रिक्षावल्याला त्यांना गाडी थांबवण्याची विनंती करत होती, मात्र तो ऐकत नव्हता. मुलगी घाबरलेली असताना अचानक तिला तिचे वडील दिसले, अन् तिने त्यांना जोराचा आवाज दिला. वडिलांना आवाज ओळखीचा वाटला वाटल्याने त्यांनी गाडी रिक्षाला अडवली. तेव्हा आपलीच मुलगी अडचणीत असल्याचे त्यांना दिसून आले. वडिलांनी नागरिकांच्या मदतीने चालकाला हिसका दाखवला. वडिलांनी एमआयडीसी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल केला असून, एमआयडीसी पोलिसांकडून रिक्षा जप्त करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे रिक्षाचालकांच्या गैर वर्तनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.