महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rickshaw Drivers Strike : रिक्षा चालकांचा औरंगाबादमध्ये आजपासून बेमुदत संप, 'या' आहेत मागण्या - औरंगाबाद रिक्षा चालक मालक समिती

आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (1 डिसेंबर) औरंगाबादमध्ये रिक्षा चालक संप करणार (Rickshaw drivers will on strike in Aurangabad) आहेत. जवळपास 15 संघटना या संपात सहभागी होणार (strike from December 1 in Aurangabad) आहेत.

Rickshaw Drivers Strike
रिक्षा चालकांचा संप

By

Published : Dec 1, 2022, 9:19 AM IST

औरंगाबाद :आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून (1 डिसेंबर) औरंगाबादमध्ये रिक्षा चालक संप करणार (Rickshaw drivers will on strike in Aurangabad) आहेत. जवळपास 15 संघटना या संपात सहभागी होणार आहेत. सतत होणारी कारवाई थांबवावी. तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अवधी वाढवण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता (strike from December 1 in Aurangabad) आहे.



बेमुदत संपावर जाण्याची घोषणा : औरंगाबाद रिक्षा चालक-मालक समितीतर्फे पत्रक काढले आहे. त्यानुसार वारंवार मागण्या करूनही प्रशासन रिक्षा चालकांकडे व रिक्षा चालकांच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरत आहे. तर रिक्षाचे इशुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ मिळावी. या कालावधीमध्ये शहरामधील रिक्षाचालक वाहन ड्रेसकोडवर मिळतील आणि त्रासही होणार नाही. तसेच यासह अनेक मागण्या पूर्ण होत नसल्याने औरंगाबाद रिक्षा चालक-मालक समितीतर्फे आजपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली (Rickshaw Drivers Strike) आहे.



रिक्षाचालकांच्या मागण्या :1) रिक्षाचे इशुरन्स, पीयुसी, टॅक्स, मीटर कॅलिब्रेशन करणे, फिटनेस, वाहन पासिंग करणे इत्यादी कागदपत्रांसाठी 28 मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळावी. 2) ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्यांची मोहिम बंद करण्यात यावी. रिक्षा चालवताना मीटर कॅलेब्रेशनसाठी 28 मार्च 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी. 3) रिक्षा चालकांच्या भविष्याचा विचार करून 283 च्या कलमाखाली रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करू नयेत. 4) वाळूज एम. आय. डी. सी. ते सिडको, हडकोमध्ये प्रायव्हेट सेक्टर कंपनीच्या बस चालकांकडून अवैधरित्या वाहतुक करण्यात येत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले (Rickshaw drivers will on strike) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details