महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप - Aurangabad

वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा सुरळीत आहेत.

डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप

By

Published : Aug 7, 2019, 4:35 PM IST

औरंगाबाद- विद्यावेतन, डॉक्टरांना विविध आजारारांसाठी रजा, महिला डॉक्टरांना प्रसूती रजा या राज्यव्यापी विषयांसह स्थानिक सोयी सुविधांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने बेमुदत संप सुरू केला आहे. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली. 387 निवासी डॉक्टरांनी यात सहभाग नोंदवला असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर जाणवायला सुरुवात झाली आहे.

डॉक्टरांच्या विविध मागण्यासाठी 'मार्ड'चा बेमुदत संप

वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात सकाळी ओपीडी सेवा देण्यात आली तसेच प्रसूती, अत्यावश्यक सेवा सुरळीत आहेत. दरम्यान, घाटी रुग्णालयाचे आदर्श वार्डसाठी सर्वेक्षण होणार असल्याने वार्ड कर्मचारी-परिचारिकांनी वार्ड चकचकीत केला आहे.

विभाग प्रमुख रुग्णसेवेवर लक्ष देऊन असल्याने सध्या काहीशी सुरळीत असलेली रुग्णसेवा संध्याकाळी विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक, उप अधीक्षक यांनी आरएमओ, हाऊस ऑफिसरच्या मदतीने वार्डातील रुग्णसेवा सुरळीत सुरू ठेवण्याची तयारी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details