औरंगाबाद - पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद औरंगाबादेतही उमटले आहेत. शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा घेवून कामबंद आंदोलन केले. सकाळी 8 ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले.
औरंगाबाद येथील निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर - बेदम मारहाण
पश्चिम बंगाल येथे एका इंटर्न डॉक्टराला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा घेवून कामबंद आंदोलन केले.
पश्चिम बंगाल येथे एका इंटर्न डॉक्टराला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या निषेधार्थ आज औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॅाक्टरांनी निषेध नोंदविला. यात 160 पैकी सुमारे 100 निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा घेतली व काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा रुग्णसेवेवर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. मात्र काही किरकोळ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कामावर असलेल्या निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध केला.
आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही -
मारहाणीच्या निषेधार्थ मार्ड संघटनेच्या वतीने सामूहिक रजा टाकत काम बंद आंदोलन केले. याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही. आंदोलनादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरुच असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.कैलास झिने यांनी दिले.