औरंगाबाद- काँग्रेसने आता जमीनवर यावे आणि आम्हाला कोणत्याही अटी किंवा शर्ती घालू नयेत, असा इशारा भारीप बहुजन महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी औरंगाबादेत दिला. बहुजन वंचित आघाडीच्या महिला संघटन बांधणीसाठी रेखा ठाकूर आणि अंजली आंबेडकर या शहरात आल्या होत्या.
काँग्रेसने जमिनीवर यावं, आमच्या सोबत अटी घालत बसू नये - रेखा ठाकूर - aurangabad
काँग्रसचे आमच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. काँग्रेसने आता जमिनीवर यावे आणि आम्हाला कोणत्याही अटी किंवा शर्ती घालू नयेत, असा इशारा भारीप बहुजन महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिला.
मागील काही दिवसांपासून काँग्रेस भारीपसोबत चर्चा करत असल्याच्या बातम्या राज्यभर देत आहेत. मात्र, मुळात आमच्या सोबत कुठलीही चर्चा त्यांची सुरू नाही. इतकच नाही तर आम्ही एमआयएमसोबत गेल्यामुळे काँग्रेसने बरेच आरोप आमच्यावर लावले होते. आधी त्या आरोपाबाबतचे स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे, असेही रेखा ठाकूर यांनी सांगितले.
राज्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या प्रतिसादानंतर आता वंचित बहुजन आघाडीने राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करत असताना काँग्रेससोबत जायचे का असा प्रश्न महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना विचारला असता, अद्याप आमच्यात कुठलीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर काँग्रेसने आता जमिनीवर यायला हवे, आमच्यावर कुठल्याही अटी शर्ती त्यांनी लावू नये. आमच्यासोबत येण्यापूर्वी त्यांनी आम्ही एमआयएम सोबत गेलो म्हणून आमच्यावर आरोप लावलेत त्याचादेखील स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे. आमच्यात कुठलीही बोलणी सुरू नाही त्यामुळे काँग्रेसने सुरू असलेल्या मस्त्या थांबवाव्यात, असा इशारादेखील त्यांनी दिला. आम्हाला बरोबरीने वागवावे आणि आमच्या ज्या जागा आहेत त्या आम्हाला द्याव्यात अन्यथा काँग्रेसला भोपळा देखील फोडता येणार नाही, अशी मिश्कील टीका रेखा ठाकूर यांनी औरंगाबादेत केली.