वैजापूर( औरंगाबाद)मुदत संपल्याने तालुका खरेदी विक्री संघाने शासकीय मका खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून घायगाव (ता. वैजापूर) येथील शेतकऱ्यांनी मका विक्रिसाठी आणलेली 85 वाहने मका खरेदी केंद्रावर उभी आहेत. मका खरेदीसाठी नकार मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान अपर तहसीलदार निखिल धुळधर यानी या वाहनांचे पंचनामे केले असून, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आल्यानंतर मका खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरीप हंगामातील मका शासकीय खरेदी केंद्रात विकण्यासाठी तालुक्यातील 957 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. ५ डिसेंबर २०२० ला मका खरेदीला सुरुवात झाली होती. शासनाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने १६ डिसेंबर रोजी हे खरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी मका घेवून आलेल्या अनेक शेतकऱ्यांना आपली मका व्यापाऱ्यांना मातीमोल भावाने विकावी लागली. 5 डिसेंबर ते 16 डिसेंबर या 11 दिवसांच्या काळात 5 हजार 500 क्विंटल मका शासकीय केंद्रावर घेण्यात आली होती. मधल्या काळात शासनाने पुन्हा वाढीव उद्दिष्ट दिल्याने 18 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मका खरेदी करण्याचे आदेश आले. या 13 दिवसांत 12 हजार 484 अशी एकूण 17 हजार 984 क्विंटल मका खरेदी झाली आहे.
ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका