महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aurangabad Crime News : मोबाईल हप्ता चुकला; वसुलीसाठी गुंडांनी दोन भावांना चोपला - वसुलीसाठी गुंडांनी दोन भावांना चोपला

मोबाईलचा चालू महिन्याचा साडेतीन हजार रुपयांचा हफ्ता भरला ( Missed mobile installment loan ) नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने आठ ते दहा जणांना तेथे बोलावून घेतले आणि दोन भावंडांना भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने मारहाण केली. (Recovery gangsters beat up two brothers) या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (beat up two brothers For Missed mobile installment loan )

Recovery gangsters beat up two brothers
वसुलीच्या गुंडांनी दोन भावांना बेदम मारहाण केली

By

Published : Dec 29, 2022, 7:39 AM IST

वसुलीच्या गुंडांनी दोन भावांना बेदम मारहाण केली

औरंगाबाद :बँकेचे हप्ते थकल्यावर वसुलीसाठी गुंड येतात हे अनेक वेळा काही जणांनी अनुभवले. (Missed mobile installment loan ) मात्र हा हप्ता मोबाईलचा असेल तर,पण हे खरे आहे. मोबाईलचा हफ्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीचा गुंड आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी दोन भावंडांना भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने मारहाण केली. ( Recovery gangsters beat up two brothers ) यातील एक जण या मारहाणीत बेशुद्ध पडला तर दुसरा दयेची भीक मागत असूनही टोळक्याने मारहाण थांबवली नव्हती, तर बघ्यांची गर्दी वाढत होती. ( Recovery gangsters beat up ) बुधवारी दुपारी औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या कॅनॉट गार्डन भागात ही घटना घडली. (beat up two brothers For Missed mobile installment loan )

फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन मोबाईल खरेदी :अनिकेत शहाणे व अभिषेक शहाणे या दोन सख्ख्या भावांपैकी अनिकेतने फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन मोबाईल खरेदी केला होता. या कर्जाचा चालू महिन्याचा साडेतीन हजार रुपयांचा हफ्ता अनिकेतकडून भरला गेला नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्याने त्याला कॉल केला. यावेळी झालेल्या चर्चेअंती दोघांची कॅनॉट परिसरात भेट झाली. अभिषेक पण अनिकेतसोबत होता. सध्या पैसे नाहीत, काही दिवसांनी पैसे भरतो, असे यावेळी अनिकेतने संबंधित वसुली करणाऱ्याला सांगितले. मात्र वसुली कर्मचारी ऐकून घेण्यास तयार नव्हता. यावरून दोघांत वाद झाला. हा वाद वाढत गेल्यावर फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या तरुणाने आठ ते दहा जणांना तेथे बोलावून घेतले.

दोन्ही जखमी भावांना रुग्णालयात हलवले :अनिकेत व अभिषेक हे दोघेही कॅनॉट परिसरातच उभे होते. आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तेथे येताच दोन्ही भावांवर हल्ला चढवला. कंबरेचे बेल्ट, दांडे हातात असलेल्या या टोळक्याने दोन्ही भावांना रस्त्यावर पाडून निर्दयीपणे मारहाण केली. या टोळक्याने दोघांना इतकी मारहाण केली की त्यात अनिकेत बेशुद्ध पडला. तरीही त्याला मारहाण करणे थांबलेले नव्हते. तर अभिषेक हात जोडून दयेची भीक मागत होता. एवढे होऊनही कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर काही स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्ये पडून दोघांना वाचवले. काही जणांनी सिडको पोलिसांना घटनेची माहिती कळवली. काही क्षणातच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले ( Aurangabad Crime News ) होते. पोलिसांनी दोन्ही जखमी भावांना रुग्णालयात हलवले.

ABOUT THE AUTHOR

...view details