महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी.. पक्षासमोर आव्हान - औरंगाबाद पदवीधर निवडणूक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्याचबरोबर भाजपचे प्रवीण घुगे व जयसिंगराव गायकवाड यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

Rebellion in BJP in Aurangabad
भाजपमध्ये बंडखोरी

By

Published : Nov 11, 2020, 9:02 PM IST

Updated : Nov 11, 2020, 9:13 PM IST

औरंगाबाद -पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता पक्षांतर्गत इच्छुकांनी बंडखोरी केल्याच दिसून येत आहे. भाजपचे प्रवीण घुगे, बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आणि माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

चंद्रकांत पाटील यांनी नाराजांची समजूत काढणार असल्याचं वक्तव्य केलं. त्यानुसार नाराज उमेदवारांची त्यांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे, असे असताना नाराजी नाट्य समोर आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. 17 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत बंडखोरी शमवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी
पक्षाने सांगितल्याने उमेदवारी अर्ज भरल्याचा घुगेंचा दावा..पक्षाने शिरीष बोराळकर यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी मला पण अर्ज सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अर्ज केला असला तरी पक्षाची भूमिका असेल ती मान्य आहे. मात्र आम्हाला तयारीला लागण्याच्या सूचना मिळाल्या असल्यानेच उमेदवारी अर्ज केल्याचं प्रवीण घुगे यांनी सांगितलं.गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा हातात घेऊन पोकळेंनी भरला अर्ज..बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. वीस वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात काम करूनही उमेदवारी नसल्याने केला अर्ज केला. आज नेते गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर ते स्वतः अर्ज भरायला आले असते. मात्र ते आज नाहीत त्यामुळे त्यांची प्रतिमा घेऊन अर्ज सादर केला. मला किमान दुसऱ्या पसंतीस उमेदवारी दिली पाहिजे होती, अस मत पोकळे यांनी व्यक्त केलं.
Last Updated : Nov 11, 2020, 9:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details