औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यावर्षी साजरी करता येणार नाही. साध्या पद्धतीने बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचे आवाहन आंबेडकरवादी नेत्यांनी नागरिकांना केले आहे.
पुस्तक वाचन अन् लिखाण करून करा बाबासाहेबांना अभिवादन; आंबेडकरवादी नेत्यांचे आवाहन - कोरोनासावट
14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यादिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर रस्त्यावर येतो. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्याने भीमसैनिकांना आपल्या घरात राहूनच सण साजरा करावा लागणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शांतताप्रिय आणि संयमी नेते होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीला ढोल-ताशे, डीजे असलेच पाहिजे असे नाही. त्यांच्या विचारांना आचरणात आणून देखील बाबासाहेबांना अभिवादन करू शकतो. त्यामुळे पुस्तक वाचा, बाबासाहेबांचे विचार वाचा, आपल्या आवड असेल तर लिखाण करून बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करा, असे मत नामांतर लढ्यातील नेते आणि बाबासाहेबांचे अनुयायी रमेशभाई खंडागळे यांनी व्यक्त केले.
14 एप्रिल म्हणजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. यादिवशी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर रस्त्यावर येतो. मात्र, यावेळी कोरोनाचे सावट असल्याने भीमसैनिकांना आपल्या घरात राहूनच सण साजरा करावा लागणार आहे.