औरंगाबाद - रावसाहेब दानवे यांनी आपल्याला निवडणुकीत कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचे स्पष्टीकरण दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता जावई धर्म पाळण्याचा आरोप केला होता. चंद्रकांत खैरे यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी वाट न पाहता ते सादर करावेत, असेदेखील हर्षवर्धन म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी निवडणुकीत कुठल्याही प्रकारची मदत केली नाही - हर्षवर्धन जाधव - चंद्रकांत खैरे
निवडणुकीच्या काळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करण्याऐवजी जावई हर्षवर्धन जाधव यांचा प्रचार केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे राहिले होते. निवडणुकीच्या काळात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा म्हणजे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा प्रचार करण्याऐवजी जावई हर्षवर्धन जाधव यांचा प्रचार केल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. मात्र, हे सर्व आरोप खोटे असून रावसाहेब दानवे यांनी माझा प्रचार केलेला नाही, असे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले.
रावसाहेब दानवे यांच्याजवळ असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच काम केले आणि खैरे यांनी ते मान्यदेखील केले. त्यामुळे त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही, माझे कुठलेही पैसे रावसाहेबांनी सोडून आणले नाही किंवा माझा प्रचार करा, असेही ते म्हणले नाही. त्यामुळे खासदार खैरे यांना काहीतरी गैरसमज झाला असावा, असे हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. इतकेच नाही तर चंद्रकांत खैरेंकडे काही पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावे, म्हणजे सर्व स्पष्ट होईल, असेदेखील हर्षवर्धन जाधव म्हणाले.