औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा शनिवारी पायी दिंडी काढणार आहे. 20 दिवसाची ही दिंडी पंढरपूर येथून निघून मुंबईत मंत्रालय पोहोचणार आहे. शिवाय, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाने केली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबादेत समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चाने पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये राज्याच्या विविध भागातून मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, राज्यभरातील मराठा समन्वयक आणि मराठा संघटना प्रमुख, मराठा सेवक सहभागी होणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात राज्यातून जास्तीत जास्त समाज बांधवांनी शनिवारी पाच वाजेपर्यंत मुंबईच्या मशाल मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले. मराठा समाजाने इतके मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडणार असेल तर यापुढे, एकाही मंत्र्यांला बंगल्याबाहेर पडू देणार नाही, असा इशारा यावेळी समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.
राज्यात भरती होऊ देणार नाही -