महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शेतकरी कर्जमाफी तकलादू, अधिवेशनानंतर आंदोलन छेडणार' - राजू शेट्टी

'शेतकऱ्यांच्या हिताच्या विषयावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष काहीच केले नाही. या सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी ना चिंतामुक्त झाले ना कर्जमुक्त' अशी टीका यावेळी शेट्टी यांनी केली.

raju shetty
'शेतकरी कर्जमाफी तकलादू, अधिवेशनानंतर आंदोलन छेडणार'

By

Published : Feb 9, 2020, 4:49 PM IST

Updated : Feb 9, 2020, 5:28 PM IST

औरंगाबाद - राज्य सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी अत्यंत तकलादू आहे. या विरोधात शिर्डीमध्ये होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनानंतर राज्यभर आंदोलन छेडणार, अशी माहिती पत्रकार परिषदेत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिली.

'शेतकरी कर्जमाफी तकलादू, अधिवेशनानंतर आंदोलन छेडणार'

'शेतकऱ्यांच्या हिताच्या विषयावर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष काहीच केले नाही. या सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे शेतकरी ना चिंतामुक्त झाले ना कर्जमुक्त' अशी टीका यावेळी शेट्टी यांनी केली. शिर्डी येथील पक्षाच्या राज्यस्तरीय संमेलनात आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : पीडित तरुणीवर चौथी शस्त्रक्रिया, प्रकृती नाजूकच

'औरंगाबाद मनपा निवडणूक लढविणार'

येत्या काही महिन्यात औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक आहे. ही निवडणूक शेतकरी पक्ष नागरी सुविधा, पाणी, स्वच्छता, भ्रष्ट कारभार मुक्त अशा विविध मूलभूत विषयांवर लढवणार, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.

हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'

...तर मनसेच्या मोर्च्याला पाठिंबा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोर्चा फक्त बांगलादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना हकलण्यासाठी असेल, तर याला माझा पाठिंबा असेल, असे पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना शेट्टी म्हणाले. 'सीएए' कायदा संविधान विरोधी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Last Updated : Feb 9, 2020, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details