औरंगाबाद- मराठवाडा वॉटर ग्रीड होणार, पण त्यापूर्वी मराठवाड्यातील धरणामध्ये पश्चिम वाहिन्या नद्या जोडण्याचा विचार आहे. वॉटर ग्रीड व नद्या जोडो प्रकल्प एकसोबत करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. वॉटर ग्रीड करत असताना धरणातून पाणी आणणे, हे गरजेचं असले तरी अनेक धरणांत पाणीच नसल्याने बाहेरून पाणी आणण्यासाठी काही उपाय करता येतील का? हे पाहावे लागणार आहे, अस मत राज्याचे मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबादेत शिवसेनेतर्फे पाणी परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उदघाटन मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह जलतज्ञांनी हजेरी लावली.
यावेळी पाणी परिषदेत घेण्यात येणाऱ्या ठरावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून पाणी परिषदेतून अनेक नवनवीन संकल्पना समोर येतात. त्यामुळे परिषदा झाल्या पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.