औरंगाबाद - मनसेच्या वतीने औरंगाबाद शहरात तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे बुधवारी औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
औरंगाबादमध्ये होणार तिथीनुसार शिवजयंती, राज ठाकरेंही लावणार उपस्थिती - raj thackeray aurangabad shivjayanti
तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार असला तरी शिवसेना आणि मनसे या पक्षांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या धास्तीने कार्यक्रमास परवानगी मिळणार का? आणि महोत्सव साजरा होईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा -नंदूरबारमध्ये आदिवासी संस्कृती.. होलिका उत्सवात पुरुष करतात महिलांच्या वेशभूषा
तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा केला जाणार असला तरी शिवसेना आणि मनसे या पक्षांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या धास्तीने कार्यक्रमास परवानगी मिळणार का? आणि महोत्सव साजरा होईल का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडणार आहे. या शिवजन्मोत्सवासाठी मनसेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी मिरवणुकीत अमित ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. मिरवणुकीत शिवकालीन युद्ध पद्धतीचे प्रदर्शन सादर केले जाणार आहे. तसेच विशेष ढोल पथक असणार आहेत. तर क्रांती चौक भागात मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी दिली. पोलिसांनी परवानगी नाकारली तर यात बदल होतील, असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा -मध्यप्रदेश सत्तापेच: 'विधानसभेत बहुमत सिद्ध करू, भाजपचे आमदारही आमच्या संपर्कात' काँग्रेस नेत्याचा दावा