औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून (दि 14) तीन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरेंनी पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात आणि प्रखर हिंदूत्वाची भूमिका घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.
राज ठाकरे यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत - राज ठाकरे यांचे औरंगाबादेत स्वागत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि भूमिका बदलल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. गुरूवारी संध्याकाळी ते पुण्याहून औरंगाबादेत आले असताना त्यांचे नागरनाक, महावीरचौक येथे मनसे कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत करण्यात आले.
![राज ठाकरे यांचे औरंगाबादेत जंगी स्वागत aurngabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6066458-thumbnail-3x2-aurngabad.jpg)
हेही वाचा -
आमदार रोहित पवारांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस ; राम शिंदेंनी दाखल केली होती याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आणि भूमिका बदलल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबादच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. गुरूवारी संध्याकाळी ते पुण्याहून औरंगाबादेत आले असताना त्यांचे नागरनाक, महावीरचौक येथे मनसे कार्यकर्त्याकडून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी राज यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यानंतर मनसेच्यावतीने शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा अध्यक्ष सुमित खांबेकर, सातनामसिंग गुलाटी आणि काही दिवसांपूर्वीच मनसेत पुन्हा प्रवेश केलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सुहास दशरथे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.