मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्षराज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा( Hanuman Chalisa Row ) पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.
राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल -औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे मुंबईहून पुण्यात दाखल झाले. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद ( Raj Thackeray Blessings from Priest pune ) घेतल्यानंतर ते पुणे शहरातून ( Raj Thackeray Aurangabad pune News ) औरंगाबादच्या दिशेने निघाले आहेत. वाटेत येताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. औरंगाबदमध्ये पोहोचल्यानंतर क्रांती चौक परिसरात कार्यकर्त्यांनी त्यांचे शहरात जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो गाड्यांचा ताफा होता.
सभेला अटी-शर्तीसह परवानगी -राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी सभा घेण्याचे जाहीर केले होते. या सभेसाठी मनसेकडून परवानगी मागण्यात आली. पण या सभेला पोलिसांनी सुरुवातीला परवानगी दिली नव्हती. त्यानंतर मनसेच्या प्रमुख नेत्यांची पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी अटी आणि शर्तींवर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. (Police Permission to Raj Thackeray Aurangabad Rally) राज ठाकरेंच्या या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी अटी-शर्तीसह -
1. सदर जाहीर सभा दिनांक 01/05/2022 रोजी 16.30 ते 21.45 या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
2. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
3. सभेसाठी बोलावलेल्या सर्व वाहनांना पोलिसांनी दिलेल्या मार्गानेच प्रवास करण्याचा व मार्ग न बदलण्याच्या सुचना द्याव्या. त्या वाहनांनी शहरात व शहरा बाहेर प्रवासा दरम्यान त्या त्या रस्त्यावर विहीत वेगमर्यादेचे पालन करावे. सभेला आलेल्या नागरीकांना त्यांचे वाहने दोन चाकी, चार चाकी व इतर कोणतेही वाहन ) पाकोंगसाटो निर्धारीत केलेल्या ठिकाणीच पाकोग करण्याच्या सुचना द्याव्यात. सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रैली काढू नये. त्याच प्रमाणे राज ठाकरे यांना अधिकृत सुरक्षा पुरविण्यात आली असून आयोजकांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी येण्याच्या व सभेवरुन परत जाण्याच्या वेळी कोणतीही रॅली काढू नये.
4. कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, स्फोटक पदार्थ बाळगू अगर प्रदर्शन करु नये व शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
5. अट क्र. 2.3.4 बाबत सभेत सहभागी होणाऱ्या नागरीकांना कळविण्याची जबाबदारी संयोजकांची राहील, सदर कार्यक्रमात स्वयंसेवक नेमण्यात यावेत. त्यांची नावे, मोबाईल नंबर तसेच सभेसाठी औरंगाबाद शहराच्या बाहेरुन निमंत्रीत करण्यात आलेल्या नागरीकांच्या वाहनांची शहर / गावांना अनुसरून संख्या, त्यांचा येण्याचा व जाण्याचा मार्ग, येणाऱ्या लोकांची अंदाजे संख्या ही माहीती सभेच्या एक दिवस अगोदर पोलीस निरीक्षक सिटीचांक यांचे कडे द्यावी.
7. सभा स्थानाची आसन व्यवस्था कमाल मर्यादा 15000 इतकी असल्यामुळे त्याठिकाणी 15000 पेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकलो, अव्यवस्था, गोंधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जवाबदार धरले जाईल.