महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाजारात शेती मालाला काय, पण तुम्हाला पण किंमत नाही - राज ठाकरे

राज ठाकरे यांनी औरगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मतदाराना भावनिक साद घातली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

By

Published : Oct 17, 2019, 6:29 PM IST

औरंगाबाद - पिकाला भाव मागता तुम्हाला भाव कुठं आहे, तुम्हाला भाव नसेल तर काही घडणार नाही. अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत केली. आम्ही सत्तेत येण्यासाठी नाही तर सक्षम विरोधी पक्ष होण्यासाठी निवडणुकीत उतरलो असून तुम्ही निवडून दिलं तर सत्ताधाऱ्यांवर लगाम लावण्याचे काम आम्ही करू, प्रश्न मांडून तुमची कामं करायला भाग पाडू, असं आश्वासन राज ठाकरे यांनी जाहीर सभेत दिले. वैजापूरचे मनसेचे उमेदवार संतोष जाधव यांच्या प्रचारासाठी ते आले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

देशात मंदीची लाट आहे, अमित शाह येतात 370 वर बोलतात. मात्र, त्याचा तुमच्या प्रश्नाचा काय संबंध असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 370 काढले अभिनंदन आता काश्मीर सुधारावा, महाराष्ट्र कसा सुधारायचा ते सांगा, बहुमत आहे ना मग करून दाखवा. राष्ट्रवादीमधील अनेक लोक ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते भाजपकडून निवडणूक लढवत आहेत, कसा बदल घडणार अशी टीका जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केली.


आमच्याकडे शेतकरी आत्महत्या होतात त्याच काही वाटत नाही, दुसऱ्यांच्या घरात होत आहे, ठीक आहे पण प्रत्येकाच्या घरात टकटक होईल तेव्हा जाग येईल. असे म्हणत शेतकरी आत्महत्येकडे राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलं. राज ठाकरे ग्रामीण भागात लक्ष देत नाहीत अशी टीका होते. विकास कामांसाठी गावच्या गाव मतदानावर बहिष्कार टाकत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना शेती नाही तर नोकरी करायची आहे. मात्र, नोकऱ्या दुसऱ्या राज्यातील लोक येऊन घेऊन चाललेत. आम्ही गावात बसून भाऊ, वडील आत्महत्या करताना पहात बसायचं. नादान लोकांमुळे अनेक जण आयुष्य संपवतात, आयुष्य संपवायचे तर ज्याच्यामुळे संपवत आहात, त्यांना संपवून जा अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे म्हणाले, की जनता जागरुक लागते, मेक्सिकोमध्ये मंत्र्याच्या हाताला दोरी बांधून रसत्यावरून फरफटत नेतात, अशी भीती पाहिजे. मात्र, तुमची भीती नाही, तुम्हीच जाब विचारला पाहिजे. निवडणुकीचा खेळ करून ठेवलाय, याचा मनस्ताप कुठं व्यक्त करणार, ही निवडणूक विरोधी पक्ष म्हणून लढतोय. मात्र, सक्षम विरोधी पक्ष व्हायचं आहे, तुमचा राग आत व्यक्त करणार, सरकारवर नियंत्रण ठेवायचे आहे. निवेदन देणाऱ्यांचा राग येतो, निवेदन देऊ नका जाब विचारा असा सल्ला त्याांनी जनतेला दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details