महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनावरुन घाबरवलं जातंय'... राज ठाकरेंची सरकारवर टीका - राज ठाकरे बातमी

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असून शिवपूजन देखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाला अजून प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसली तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

raj-thackeray-comment-on-corona-virus-in-aurangabad
'कोरोनावरुन घाबरवलं जातंय'...

By

Published : Mar 11, 2020, 10:22 PM IST

औरंगाबाद- कोरोनाचे नाव पुढे करून प्रशासन लोकांना घाबरवतंय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रात एकही जण कोरोनामुळे दगावलेला नसताना नाशिकमध्ये कलम 144 कशासाठी लावले, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

'कोरोनावरुन घाबरवलं जातंय'...

हेही वाचा-'शरद पवारांनीही पक्ष बदलला मग त्यांचाही बाप काढणार का?'

दरवर्षी महाराष्ट्रात दीड लाख लोक टीबीने मरतात. त्याचे काही नाही. पहिल्यांदा निवडणूक रद्द करुन दाखवा. शिवजन्मोत्सव काय रद्द करताय, असाही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला विचारला.

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाणार असून शिवपूजनदेखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाला अजून प्रशासनाकडून परवानगी मिळाली नसली तरी परवानगी मिळेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. कोरोनाची भीती निर्माण केली जात आहे. त्यामुळे होळीला नियम लावले. त्यानंतर आता शिवजन्मोत्सवाला ही लावणार आहोत का? असा सवाल त्यांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details