औरंगाबाद - शुक्रवारी (दि. 8 मे) पहाटे करमाडजवळ सटाणा येथे झालेल्या रेल्वे अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे विभागावर टीका केली जात आहे. या घटनेची माहिती व्हावी आणि अचूक निदान केले जावे यासाठी ही चौकशी केली जाणार आहे.
दक्षिणमध्य रेल्वेविभागात एका मालवाहू रेल्वेच्या धडकेत शुक्रवारी 16 मजुरांचा मृत्यू झाला. जालन्याहून पायी येणारे मजूर रेल्वे रुळावर मालगाडी आली. येणाऱ्या रेल्वेचा आवाज मजुरांना कळला नाही आणि रेल्वे त्या मजुरांना चिरडून निघून गेली. या घटनेने देश हादरला, अनेकांनी रेल्वेवर टीका केली. नेमकी घटना कशी घडली आणि काय झाले याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. याबाबत रेल्वे विभागाने एक पत्रक जारी करून या घटनेबाबत काही माहिती असले काही पुरावे असतील असे पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
'त्या' अपघाताची रेल्वेकडून चौकशी, सोमवारी अधिकारी येणार औरंगाबादला - etv bharat news
करमाडजवळ सटाणा येथे झालेल्या रेल्वे अपघातात 16 मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेची तपासणी रेल्वे सुरक्षितता आयुक्त रामकृपाल हे करणार आहेत.
औरंगाबाद येथे सोमवारी (दि. 11मे) सकाळी 10.30 वाजता विमानचालन मंत्रालय यांच्यामार्फत दक्षिण-मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद येथील मुख्यालयातील रेल्वे सुरक्षितता आयुक्त रामकृपाल हे चौकशी करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी (दि. 12 मे) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात चौकशी करणार आहेत. घटनेसंदर्भात जर कोणाकडे काही माहिती किंवा पुरावा असल्यास त्यांनी 040-27820104 या क्रमांकावर त्यांच्याशी संपर्क साधवा, असे या पत्रकात लिहिले आहे.
हेही वाचा -पैठणमध्ये तब्बल दिड महिन्यांनंतर अटी आणि शर्थीनुसार दुकाने सुरू