महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ औरंगाबादेत लाल बावटाकडून रेल रोको - Aurangabad RailRoko Agitation

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ लालबावटा संघटनेने लासूर येथे रेल रोको आंदोलन केलं सकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशन निघणारी जनशताब्दी एक्सप्रेस दहा मिनिटं अडवून त्यांनी हे आंदोलन केलं शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी लाल बावटा संघटनेचे राम बाहेती यांनी केली.

Railroko agitation at Lasur station in Aurangabad
लालबावटा संघटनेने लासूर येथे रेल रोको आंदोलन केलं

By

Published : Feb 18, 2021, 11:34 AM IST

Updated : Feb 18, 2021, 12:22 PM IST

औरंगाबाद - दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ लालबावटा संघटनेने लासूर येथे रेल रोको आंदोलन केले आहे. गुरुवारी सकाळी औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथून निघणारी जनशताब्दी एक्सप्रेस दहा मिनिटं अडवून त्यांनी हे आंदोलन केलं. शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी लाल बावटा संघटनेचे राम बाहेती यांनी केली.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ औरंगाबादेत लाल बावटाकडून रेल रोको
आंदोलनात सरकारी विरोधी दिल्या घोषणादिल्ली येथे गेल्या 80 दिवसांपासून शेतकरी कायदे रद्द करावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने अद्याप या आंदोलनाची गंभीर दखल घेतलेली नाही. कायदे रद्द केल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, मात्र केंद्र कायदे रद्द करायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी आणि सरकार हा संघर्ष वाढत चालला आहे. आज शेतकऱ्यांच्या समानार्थ रेलरोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये लाल बावटा संघटनेने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ लासुर स्टेशन येथे रेल रोको आंदोलन केले. जवळपास 10 ते 15 मिनिटे आंदोलन करण्यात आले, यावेळी लालबावटा संघटनेने केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.दहा मिनिटांसाठी अडवली जनशताब्दी एक्सप्रेसदिल्ली शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत राज्यात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. सकाळी दहाच्या सुमारास लालबावटा संघटनेने औरंगाबादच्या लासुर स्टेशन येथून आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर विविध शेतकरी संघटना औरंगाबादच्या मुख्य रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे कुठलीही अपरिहार्य घटना होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Last Updated : Feb 18, 2021, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details