औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण सरकारच्या विरोधात नसून मराठवाड्यातील प्रलंबित मागण्यांसाठी आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही मराठवाड्यातील पाणी प्रश्नाबाबत अनेक उपाय योजना केल्या असल्याचा दावा यावेळी पंकजा मुंडे यांनी केला.
मराठवाड्याच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी उपोषण - पंकजा मुंडे हेही वाचा -मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी पंकजा मुंडे करणार उपोषण
मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण करत असताना हे उपोषण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पंकजा आणि भाजपमध्ये आलबेल असल्याचे बोलले जात होते. मात्र, हे उपोषण भाजपच्या झेंड्या खाली होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर करत आपला आता आणि आधी कुठलाच वाद नसल्याचं पंकजा यांनी जाहीर करत या वादावर पडदा टाकत आपण भाजप सोबत असल्याचे पुन्हा स्पष्ट केले.
हेही वाचा -'मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अगोदर केंद्रात बिल मंजूर करा'
राज्यात सरकार आताच स्थापन झाले असून आपले उपोषण सरकार विरोधात नसून मराठवाड्याची कन्या म्हणून पाण्याचा प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद व्हावी, यासाठी असल्याचे पंकजा यांनी सांगितले. उपोषणाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.