महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Teacher Arrested In Aurangabad : मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Teacher arrested news

पडेगाव परिसरात एक खाजगी कोचिंग क्लास ( Private Coaching Class ) सुरू आहे. दरम्यान या क्लासेसमध्ये अमोल हा फिजिक्स (भौतिशास्त्र) विषय शिकवतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो वर्गातील अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तन ( Indecent Treatment of Underage Girls ) करून छेड काढत होता. दरम्यान ही बाब एका मुलीने पालकांना सांगितली. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दामिनी पथकाला ( Damini Pathak ) घटनेची माहिती दिली.

छावणी पोलीस ठाणे
छावणी पोलीस ठाणे

By

Published : Dec 3, 2021, 9:59 AM IST

Updated : Dec 3, 2021, 1:05 PM IST

औरंगाबाद - मुलींच्या अंगाला सतत हात लावणे, अश्लील बोलणे, भौतिकशास्त्र ( Physics ) शिकवताना त्यातील अश्लीलता सांगणे, तुम्ही माझ्यासोबत संबंध ठेवल्यास काही होत नाही असे म्हणत छेड काढणाऱ्या एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला ( Private Coaching Class Teacher Arrested ) दामिनी पथकाच्या ( Damini Pathak ) मदतीने बेड्या ठोकल्या आहे.

मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अमोल रावसाहेब गवळी (वय ३३, रा. पडेगाव) असे या शिक्षकाचे नाव आहे. पडेगाव परिसरात एक खाजगी कोचिंग क्लासेस सुरू आहे. दरम्यान या क्लासेसमध्ये अमोल हा फिजिक्स (भौतिशास्त्र) विषय शिकवतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो वर्गातील अल्पवयीन मुलींशी असभ्य वर्तन ( Indecent Treatment of Underage Girls ) करून छेड काढत होता. दरम्यान ही बाब एका मुलीने पालकांना सांगितली. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दामिनी पथकाला घटनेची माहिती दिली.

दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमप, हवालदार आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, लता जाधव आणि चालक गिरीजा आंधळे यांनी सदर शिक्षकांची माहिती घेऊन छावणी पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. दरम्यान याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून कायद्यांतर्गत छावणी पोलीस ठाण्यामध्ये ( Camp Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक करीत आहेत.

Last Updated : Dec 3, 2021, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details