महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे पैठणच्या खुल्या कारागृहातील कैदी सुट्टीवर! - पैठण खुले कारागृह बातमी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने पैठणच्या खुले कारागृहातील कैद्यांना पेरोल रजेवर सोडल्याने पैठणचे कारागृह तुर्तास रिकामे आहे.

पैठण कारागृह
पैठण कारागृह

By

Published : May 4, 2021, 7:03 PM IST

पैठण - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने पैठणच्या खुले कारागृहातील कैद्यांना पेरोल रजेवर सोडल्याने पैठणचे कारागृह तुर्तास रिकामे आहे. कैद्यांच्या वाट्याला असलेली शेतीची कामे आता जेल पोलिसांना करावी लागत आहेत.

बंदीस्त कारागृहात चांगली कामगिरी करणार्‍या कैद्यांना त्यांच्या शिक्षेच्या अंतिम काही वर्षात पैठणच्या खुल्या कारागृहात ठेवले जाते. पैठणच्या खुल्या कारागृहात आतापर्यंत जवळपास पाचशे ते साडेपाचशे कैदी खुल्या स्वरुपात आपली उर्वरित शिक्षा भोगत आहेत. खुल्या कारागृहात कैद्यांना दिवसभर मोकळे सोडले जाते, त्यांच्याकडून जेलच्या नावे असलेल्या सुमारे पाचशे ते सहाशे एकर शेतीत कामे करायला लावतात, जेलकडे काही शेतीउपयोगी जनावरे देखील आहेत. त्यांचा सांभाळ करणे, त्यांची निगा राखणे आदी कामे या कैद्यांना करावी लागतात, तर इतर कैद्यांकडून त्यांच्या कुशलतेप्रमाणे खुल्या स्वरुपात कामे दिली जातात. माञ, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने कारागृहातील जवळपास सर्वच कैद्यांची पेरोलवर सुटका केली असल्याने जेलच्या ताब्यात असलेली जमीन व जनावरांची देखभाल ही सध्या तरी जेलमध्ये कर्तव्यावर असलेल्या तीस ते पस्तीस पोलीस कर्मचार्‍यांना करावी लागते.

अचानक कैद्यांना पेरोलवर सोडावे लागल्याने जेलच्या शेतीची थोडेफार नुकसान होत आहे. आजमीतीस जेलच्या पाचशे साडेपाचशे कैद्यांपैकी जेलमध्ये पंधरा ते वीसच असे कैदी आहेत, ज्यांची पेरोलसाठी जामीन घेण्यासाठी कोणीच नातेवाईक आले नाहीत, अशा पद्धतीने वाढता कोरोना संसर्ग पाहता शासनाला कैद्यांना बळच सुट्टीवर पाठवायची वेळ आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details