औरंगाबाद- पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. त्यामुळे आरोपीच्या संपर्कात आलेल्या 27 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
चार दिवसांपूर्वी अटक केलेला व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह... 27 पोलीस होणार क्वारंटाईन
चार दिवसांपूर्वी औरंगाबादच्या सिटीचौक पोलिसांनी चेलीपुरा भागातून नशेच्या गोळ्या विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली होती. या आरोपीला कोठडीत टाकण्यापूर्वी त्यांची कोरोनसह वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान त्याला घाटी रुग्णालयातील विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून त्यात आरोपीला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा-पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
चार दिवसांपूर्वी औरंगाबादच्या सिटीचौक पोलिसांनी चेलीपुरा भागातून नशेच्या गोळ्या विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली होती. या आरोपीला कोठडीत टाकण्यापूर्वी त्यांची कोरोनसह वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान त्याला घाटी रुग्णालयातील विशेष कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून त्यात आरोपीला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले आहे.
आरोपीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सिटीचौक पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या 27 पोलीस कर्मचार्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पोलिसांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यावरही पोलिसांनी खबरदारी घेतल्याने त्यांना बाधा होणार नाही. मात्र, तरी देखील त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.