औरंगाबाद- लोकविकास नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ जाधवसह रोखपालास सव्वालाखाची लाच घेताना लाचलुचपत खात्याने गुरुवारी (दि. 2 जुलै) अटक केली आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळातून तक्रारदाराला यांना कर्ज पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी लोकविकास सहकारी बँकेत कर्ज मागणीची फाईल टाकली होती. ती कर्ज मंजूर करण्यासाठी रोखपालाने अध्यक्षांना बोलावे लागेल, असे सांगितले होते. कर्ज मंजुरीसाठी सव्वा लाख रुपये लाचेची मागणी जगन्नाथ जाधव व त्याचा सहकारी आत्माराम संपत पवार याने तक्रारदारास केली होती. तक्रारदारांना लाच द्यायला असमर्थ असल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.