महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप - औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

डॉ. अमीत गुंजाळ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी औरंगाबादेतील घाटी रुग्णालय चौकीचे पोलीस नाईक एम. डी. सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मा

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

By

Published : Oct 28, 2019, 3:20 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील गंगापूर येथे प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ५ वाजता घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

आशमा हमीद शेख, असे मृत महिलेचे नाव आहे. तिला २६ ऑक्टोबरला शहरातील डॉ. अमित गुंजाळ यांच्या ओमसाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. गुंजाळ यांनी तिची प्रसुती केली. मात्र, प्रसुतीनंतर तिला जास्त रक्तस्त्राव सुरू झाला. तिचा रक्तदाब वाढला असल्याचे सांगून तिला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, नातेवाईक मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. तसेच डॉ. अमीत गुंजाळ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी औरंगाबादेतील घाटी रुग्णालय चौकीचे पोलीस नाईक एम. डी. सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details