औरंगाबाद -सासू नंदेच्या त्रासाला कंटाळून २१ वर्षीय गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. अचल विशाल रिडलोन (वय 21 वर्षे रा. गांधी नगर) असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. अचल हिचा विशाल यांच्याशी २०२० साली नोव्हेंबर महिन्यात विवाह झाला होता. विशाल हा कंत्राटी पद्धतीने स्वच्छतेचे काम करतो. त्यासोबत वराह पालनाचा देखील व्यवसाय करतो. गेल्या सहा महिन्यांपासून अचलला सासू दोन नंदा व दोन दिर त्रास देत होते. सोमवारी रात्री सासू व नणंद मारहाण करत असल्याचा फोन करून अचलने आईला सांगितले.
रात्री घेतला गळफास :पती वराह पालन केलेल्या ठिकाणी गेला. यावेळी अचल ही घरात होती. दरम्यान रात्रीला अचलने घरात ओढाणीच्या साहायाने गळफास घेतला. काही वेळाने ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच तिला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.