महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैठण तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग - रासायनिक खतांच्या किमती बद्दल बातमी

पैठण तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

Pre-monsoon farming has started in Paithan taluka
पैठण तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग

By

Published : May 18, 2021, 8:05 PM IST

पैठण -तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग आलेला असून यातच शेती पिकासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी दुकानात दाखल होत आहेत. खतांच्या वाढलेल्या किंमती ऐकून शेतकर्‍यांचा हिरमोड होत आहे. खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील काही कृषी दुकानदारांकडे जुने रासायनिक खत आहे. ते ओळखीच्या शेतकर्‍यांना कमी किंमतीत अन् काही शेतकर्‍यांना जुनेच खत नवीन वाढीव किंमतीत देखील विक्री होत असून यात शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे.

पैठण तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीच्या कामाला वेग

रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्‍यांचे खरिपाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यावर्षी खरीप पेरणीची तयारी शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, खतांच्या दरवाढीचे नवे संकट ओढवल्याचे चित्र आहे.

जुनेच खत नवीन किंमतीत -

नवीन खताची किंमत वाढल्याचे सरकारकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कंपन्यांनी खताचे दर वाढवून दिले आहेत, असा आरोप शेतकरी करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details