औरंगाबाद :शाळेत असताना गणित विषयाचा अभ्यास आणि त्यातही पाढे पाठ करायचं म्हणलं की, अनेकांसाठी ते सर्वात कंटाळवान काम असतं. मात्र औरंगाबादच्या एका चिमुकल्याने तर त्यातही विक्रम केला आहे. अवघ्या पाच वर्षाच्या वयात (five year old boy) पठ्ठ्याने एका मिनिटात सात पर्यंत पाढे (read up to seven number Table in one minute) म्हणत, नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सर्वत्र त्याच्या वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या चिमुकल्याचं नाव प्रणित बाहेती (Praneet Baheti) असून, त्याच्या गुणाची नोंद वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड (World Wide Book of Records) मध्ये करण्यात आली आहे.
आगळा वेगळा विक्रम :सध्याच्या युगात नवे नवे विक्रम नोंदवले जातात. यामध्ये कोणी उड्या मारण्यात, तर कोणी धावण्यात अशा प्रकारांमध्ये विक्रमांची नोंद करत असते. काही वर्षात तेच रेकॉर्ड पुन्हा मोडले जातात आणि नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केले जातात. असाच एक आगळावेगळा विश्वविक्रम औरंगाबादच्या प्रणित बाहेती यांनी केला आहे. वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याच्या कलेची नोंद घेण्यात आली आहे. कमी वेळेत कोण जास्तीत जास्त पाढे म्हणू शकतो, याबाबत आगळीवेगळी स्पर्धा होती. यात स्पर्धेत 800 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात प्रणित हा सर्वात लहान वयाचा स्पर्धक होता. याने एका मिनिटात सात पर्यंत न अडखळता पाढे म्हणून दाखवले. त्याच्या या कलेची नोंद घेत, नवा विक्रम म्हणून घोषित करण्यात आले. तो जगातील सर्वात कमी वयात एका मिनिटात सर्वाधिक पाढे म्हणणारा विक्रमवीर म्हणून घोषित करण्यात आला. त्याचे वडील अॅड. अक्षय बाहेती यांना मेल द्वारे त्याबाबत माहिती देण्यात आली आणि प्रमाणपत्रही पाठवण्यात आलं.