औरंगाबाद- सरकार पाच टक्के लोक वाचवण्यासाठी इतर लोकांना वेठीस धरत आहे, त्यांचा बळी घेतला जात आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून लॉकडाऊन अमान्य करून जनजीवन सुरळीत सुरू करा. लॉकडाऊनला पाठिंबा नाही, हे दर्शवण्यासाठी लोकांनी ज्या झेंड्याला मानत असाल त्याने तो झेंडा आपल्या घरावर फडकवा, तिरंगा फडकवला तर उत्तम, आम्हाला लॉकडाऊन मान्य नाही, ते सरकारला सांगा असे आवाहन वंचित बहुजन पक्षाचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाच्या काळात 80 टक्के लोकांमध्ये प्रतिकार शक्ती वाढली आहे. तर लक्षणे दिसणाऱ्या 15 टक्के लोकांना सामान्य औषधी देऊन उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे 130 कोटी लोकसंख्येपैकी पाच कोटी लोकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, त्यांची प्रतिकार शक्ती वाढवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नाही. भूकबळी किंवा इतर कारणाने हातावर पोट असणारे लोक मरणार आहेत. लॉकडाऊनच्या चक्रात केंद्र आणि राज्य सरकार अडकले आहे, त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याची वेळ आली असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
आजपासून बाजारपेठा उघडून लॉकडाऊनचा विरोध करा, प्रकाश आंबेडकरांचे व्यापारी-जनतेला आवाहन - प्रकाश आंबेडकर औरंगाबाद
शनिवारी बकरी ईद आहे. त्यानंतर रक्षाबंधन आहे. सण सुरू होत असल्यामुळे सर्व दुकाने उघडा, पान टपऱ्या, रिक्षा, बस चालक आणि वाहकांनी स्वतः कामावर जावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना मोफत अन्न धान्य देण्याची घोषणा केली, मात्र त्याचे काही झाले नाही. खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम सर्वसामान्य लोकांनी केले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शनिवारी बकरी ईद आहे. त्यानंतर रक्षाबंधन आहे. सण सुरू होत असल्यामुळे सर्व दुकाने उघडा, पान टपऱ्या, रिक्षा, बस चालक आणि वाहकांनी स्वतः कामावर जावे, असे आवाहन त्यांनी केले. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना मोफत अन्न धान्य देण्याची घोषणा केली, मात्र त्याचे काही झाले नाही. खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याचे काम सर्वसामान्य लोकांनी केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊन मान्य करू नका, पहिल्या सारखे जीवन जगायला सुरुवात करा, सण हवे तसे साजरे करा, सार्वजनिक वाहतूक सुरू करा अशी मागणी त्यांनी केली. मी कायद्याचे उल्लंघन करण्यास सांगतोय त्यामुळे माझ्यावर गुन्हे दाखल करा, मला मान्य आहे. मात्र, सामान्य माणसाचे जीवन सर्वसामान्य झाले पाहिजे. डॉक्टरांच्या मेहनतीमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे, याबद्दल मोदींनी जनतेला सांगावं परंतु तसे होत नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. पोट निवडणूक असेल तर ठीक आहे. मात्र, मुख्य निवडणूक पुढे ढकलण्याचा अधिकार कोणाला नाही, तो अधिकार घटनेने दिला नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर केली.