औरंगाबाद - एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव ओवेसींकडे पाठवला होता. या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी आंबेडकरांना पत्र पाठवले आहे. २६ ऑगस्टला हैद्राबाद येथे दोनही नेत्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
'वंचित-एमआयएम'चा जागा वाटपाचा तिढा कायम; हैदराबादेत आंबेडकर-ओवेसींची होणार बैठक - असदुद्दीन ओवेसी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचीत बहुजन आघाडीची हैद्राबादमध्ये बैठक होण्याची शक्यता.
गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखती घेतल्या जात आहेत. एमआयएमने जागावाटपात ७६ जागा मिळाव्या अशी मागणी केली होती. मात्र, वंचितची कोर कमिटी याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घ्यायला तयार नाही. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला १४० जागांची ऑफर देऊ केली आहे. त्यात आता आमची कोंडी होणार अशी शक्यता निर्माण झाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव असदुद्दीन ओवेसींकडे पाठवला होता.
याअनुषंगाने एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र पाठवले आहे. औरंगाबादचे एमआयएमचे नेते डॉक्टर गफार कादरी यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन ओवेसी यांनी दिलेले पत्र सुपूर्द केले.