औरंगाबाद - सीएए आणि एनआरसी विरोधात न्यायालयात जाऊ नका, तुम्हाला न्याय मिळणार नाही. कारण, न्यायालय आता आपले राहिले नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. सीएएच्या विरोधात काढण्यात येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
पुढे ते म्हणाले, अजित पवार मनाने मोकळा असलेला माणूस आहे. त्याला जे वाटत तो ते स्पष्ट बोलतो, त्यांची बारामतीमध्ये झालेली पत्रकार परिषद ऐका. भाजप का मोठा आहे, भाजप काय करणार आहे हे लक्षात येईल, अशी टीकाही त्यांनी केली. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात उभे राहतात. हिंदूंनादेखील सोबत घ्या. ही लढाई एकट्या मुस्लिमांची नाही, असा टोला आंबेडकर यांनी एमआयएमला टोला लगावला.
सीएए आणि एनआरसी विरोधात औरंगाबादेत जवळपास 40 पक्ष-संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात वंबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मुस्लीम धर्मगुरू यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा महाराष्ट्र सामाजिक एकता शिकवणाऱ्या महापुरुषांचा आहे. ही लढाई कोणत्या एका समाजाची नाही. आमच्याकडे गांधीजींच्या आदर्शाचे शस्त्र आहे. इंग्रजांना देशातून हाकलून दिले, तर हे कोण आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लावला.