औरंगाबाद -पैठण तालुक्यातील बिडकीन गावाजवळील तोंडुळी वस्तीवर दोन महिलांवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली. त्यानंतर आता राजकारण देखील तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आज घटनास्थळी भेट देऊन सरकारवर निशाणा साधला. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
- चित्रा वाघ यांची सरकारवर टीका -
पैठण येथील घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. राज्यात महिला व मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. अत्याचारग्रस्त कुटुंबीयांना तातडीची मदत केली पाहिजे. शिवशाहीचे वचन देणार्यांनी निजामशाही आणली आहे. राज्यात मोगलाई आली आहे. यांचे माजी गृहमंत्री फरार होतात, तर हे आरोपी कसे सापडतील?, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
- नीलम गोऱ्हे लवकरच घेणार पीडित कुटुंबियांची भेट -