औरंगाबाद- खडकेश्वर परिसरातील अनुराधा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका महिलेने दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरी गौतम तांबोळी, असे या महिलेचे नाव असून त्या गृहिणी होत्या. दुपारी बराच वेळ होऊनही त्या बेडरुमच्या बाहेर न आल्याने पतीने खिडकीतून आत पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
पती घरात असतानाच पत्नीची बेडरुममध्ये आत्महत्या - अधिकारी
खडकेश्वर परिसरातील अनुराधा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या गौरी गौतम तांबोळी या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.गौरी यांचे पती निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. दुपारी बराच वेळ होऊनही त्या बेडरुमच्या बाहेर न आल्याने पतीने खिडकीतून आत पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
गौरी यांचे पती निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गौरी त्यांच्या लहान मुलीला समर कॅम्पला सोडायला गेल्या होत्या. त्यानंतर घरी परतल्यावर काही वेळाने त्या बेडरुममध्ये गेल्या. परंतु बराच वेळ होऊनही गौरी बाहेर आल्या नाही. म्हणून त्यांच्या पतीने दरवाजा वाजवला. परंतु प्रतिसाद येत नसल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी खिडकीतून आत डोकावले असता त्यांनी गळफास घेतल्याचे समोर आले.
क्रांतीचौक पोलिसांनी घटनास्थळी जात गौरी यांना खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी किंवा मजकूर लिहिलेला आढळला नसून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे पोलीस नाईक शिवाजी वाडेकर यांनी सांगितले.