औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही एसआरपीएफ व सीआरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. रमजान ईद पर्यंत हा बंदोबस्त कायम असून त्यामध्ये वाढ होणार, असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
औरंगाबादमध्ये लोकसभा निकालानंतरही पोलीस बंदोबस्त कायम राहणार - पोलीस आयुक्त
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही एसआरपीएफ व सीआरपीएफ पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सलग 4 वेळेस खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांचा पराभव होऊन एमआयमचे इम्तियाज जलील हे विजयी झाले आहेत. त्यानंतर शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, पोलिसांचा तगडा बंदोबस्त व योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु रजमान ईद पर्यंत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी एसआरपीएफ व सीआरपीएफच्या प्लाटूनचा बंदोबस्त कायम ठेवला आहे. तर आवश्यकता असल्यास त्यामध्ये वाढ करण्याचे देखील पोलिसांचे नियोजन आहे, अशी महिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.