महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिल्लोड शहरातील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई; एका महिलेसह दोघांना अटक - सिल्लोड शहरातील कुंटणखाना

शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आव्हाना रस्त्यावरील नुर कॉलनीत करण्यात आली. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या साहेब खाँ मुन्शी खाँ पठाण याच्यासह एक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नुर कॉलनीतील एका घरात कुंटणखाना चालतो, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती.

sillod
सिल्लोड शहरातील कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई

By

Published : Nov 30, 2019, 10:28 PM IST

औरंगाबाद -सिल्लोड शहरात कुंटणखाना चालवणाऱ्यांना शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास शहरातील आव्हाना रस्त्यावरील नूर कॉलनीत करण्यात आली. याप्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या साहेब खाँ मुन्शी खाँ पठाण याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नुर कॉलनीतील एका घरात कुंटणखाना चालतो, अशी माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, पोलीस नाईक संजय आगे, पंडित फुले, कृष्णा दुबाले, महिला पोलीस कर्मचारी वैशाली सोनवणे, गिता दांडगे, जयश्री मालकर यांनी सापळा रचून बनावट ग्राहक पाठवला.

हाही वाचा -औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे हायवा ट्रक पेटला

कुंटणखाना चालत असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा मारला आणि कुंटणखाना चालवणाऱ्या दोघांसह चार जणांना ताब्यात घेतले. यात कुंटणखाना चालवणारा एक पुरुष, एक महिला व अन्य दोन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details