महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिशोर पोलीस ठाण्यात आत्महत्या केलेल्या आरोपी प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित - Pishor suicide case

कन्नड तालुक्यातील एका 15 वर्षीय मुलीचे भगवान मालकर यांनी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून 16 जानेवारी रोजी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी महालकर यांनी जानेवारी रोजी अटक केली होती. कोठडी दरम्यान 22 जानेवारीला सकाळी पावणेआठच्या सुमारास महालकर यांनी ऍसिड प्राशन केले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलीस कर्मचारी निलंबित
पोलीस कर्मचारी निलंबित

By

Published : Jan 25, 2021, 5:43 PM IST

औरंगाबाद - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून भगवान हरिदास महालकर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र 22 जानेवारी रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास महालकर यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातील शौचालयात ऍसिड घेतले. घाटीत उपचार सुरू असताना त्यांचा 23 जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला.

घटना काय होती?

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घाटी बाहेर ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत महालकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता. कन्नड तालुक्यातील एका 15 वर्षीय मुलीचे भगवान महालकर यांनी अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून 16 जानेवारी रोजी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी महालकर यांना अटक केली होती. कोठडी दरम्यान 22 जानेवारीला सकाळी पावणेआठच्या सुमारास महालकर यांनी ऍसिड प्राशन केले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नातेवाईकांची मागणी

या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम विभागाचे जिल्हा अध्यक्ष योगेश बन, खुलताबाद तालुका अध्यक्ष व मुक्तार सय्यद, सदस्य पोलीस पी. के. दाभाडे, वसंत शिरसाट, अॅडव्हकेट सागर मोरे नवनाथ भारती अशोक महालकर, राहुल भालेराव यांनी संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच महालकर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून काढलेल्या दोन लाख रुपयांची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

तातडीने निलंबनाची कारवाई

महालकर यांच्या आत्महत्येस पोलीस कारणीभूत असल्याची मागणी केल्यावरून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने शिपाई मजेत पठाण यांना निलंबित करण्यात आले. यावेळी घाटीत कन्नड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर लेंगे बेगमपुरा पोलीस ठाण्याचे संदीप सानप कर्माचे संतोष आणि खुलताबाद पोलीस निरीक्षक सीताराम म्हात्रे यांची उपस्थिती होती. प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घाटीत आंदोलन केले. त्यामुळे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या सूचनेनुसार पाचारण करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -भारत-चीन सीमावाद : अडीच महिन्यानंतर पुन्हा चर्चा; काय घडलं वाचा

ABOUT THE AUTHOR

...view details