औरंगाबाद- अर्ज निकाली काढण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारताना जमादाराला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. हर्सूल पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. सतीश यशवंतराव जाधव (वय ५२ वर्षे), असे लाच स्वीकारणाऱ्या जमादाराचे नाव आहे.
चार हजाराची लाच स्वीकारताना जमादार एसीबीच्या जाळ्यात - LCB news
चार हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
![चार हजाराची लाच स्वीकारताना जमादार एसीबीच्या जाळ्यात](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4489919-thumbnail-3x2-aur.jpg)
तक्रारदार यांच्या अर्जावर चौकशी न करता ते अर्ज निकाली काढण्यासाठी जाधव यांनी ४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविल्यानंतर ४ सप्टेंबरला पंच, साक्षीदारासमक्ष जाधव यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केली होती. त्यानंतर आज पैसे देण्याचे ठरले होते. त्यामुळे एसीबीचे निरीक्षक विकास घनवट यांच्या पथकाने सापळा रचला व जाधव हे लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.