औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीत राहणारा 21 वर्षाचा तो आणि अल्पवयीन मुलगी दीड वर्षांपूर्वी घरातून पसार झाले होते. तब्बल दीड वर्षानंतर सायबर पोलिसांना त्यांचा पत्ता सापडला. पोलिसांनी त्यांचा शोध घेत पाठलाग केला. मात्र, दोघेही पोलिसांना बघताच तब्बल चार किलोमीटर पळत जाऊन पाण्याच्या कॅनलमधून उसाच्या शेतात लपले होते.
शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत राहणारा रोहन (नाव बदलले आहे) हा त्याच्या आईसोबत भाड्याच्या खोलीत राहत होता. दरम्यान, त्याचे घरामालकाच्या मुलीशी सूत जुळले. त्यानंतर दोघांनीही घरातून पलायन केले. त्यानंतर मुलींच्या घरच्यांनी पोलिसात तक्रारी दिली. त्यावरुन पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, तब्बल दीड वर्षे हे प्रेमी युगुल पोलिसांना चकवा देत होते.