औरंगाबाद -जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील सायगव्हान भागातील गडदगड नदीकाठी अवैधरित्या गावठी दारू बनविन्याची भट्टी सर्रासपणे सुरू होती. या भट्टीला कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे दुरक्षेत्र नागद पोलिसांच्या वतीने उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील अवैध दारुभट्टीवर पोलिसांचा छापा; भट्टी उद्ध्वस्त - aurangaba illegal brewery news
कन्नड तालुक्यातील सायगव्हान या गावातील गडदगड या नदीकाठी असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भट्टी आणि दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट केले. दरम्यान, सदर आरोपीने घटनास्थळाहुन पळ काढला असून सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
अधिक माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील जंगलकाठी असलेल्या सायगव्हाण गावाजवळ गडदगड नदीकाठी गावठी दारू बनविन्याची भट्टी सर्रासपणे सुरू होती. ही दारू बनवून इतर गावात अवैधरित्या विक्री केली जात असे. याबाबत कुणालाही चाहुल लागलेली नसल्याने हा धंदा सर्रासपणे सुरू होता. दरम्यान, ही गावठी दारूभट्टी नदीकाठी चालत असल्याची माहिती पोलिसांना लागली. माहितीच्या आधारे 23 मे रोजी पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी भट्टीत दारू बनविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आरोपीला पोलीस येण्याची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढला. पोलिसांनी या छाप्यात दारूभट्टीसह 500 ते 600 लिटर दारू बनविन्याचे रसायन उद्ध्वस्त केले. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश सातव, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल भामरे, पोलीस मित्र कुमावत, समाधान पाटील यांनी केली.