औरंगाबाद - बेगमपुरा पोलीस ठाण्याचे हवालदार भास्कर शंकर मेटे (52) यांचे कोरोनासदृश्य आजाराने शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांनी 8 दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू -
भास्कर मेटे हे बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान 8 दिवस आधी त्यांनी कोरोनाची लस घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. तसेच त्यांना दोन दिवस सतत खोकला येत होता. ताप आल्याने मुलीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा सिटीस्कॅन केले. सिटी स्कॅनच्या अहवालानुसार डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लक्षणे असल्यामुळे पुढील उपचाराकरिता एमजीएम कोविड सेंटर येथे पाठविले. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेचा निकाल जाहीर, चार हजार 798 विद्यार्थी उत्तीर्ण