औरंगाबाद - कन्नड तालुक्यात 3 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस सुरू आहे. यामुळे गौताळा अभयारण्यातील सायगव्हान घाटात दरड कोसळली होती. या भागातून वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने, दरड कोसळली, त्या वेळी येथून वाहन किंवा व्यक्ती जात नसल्याने अपघात अथवा जीवितहानी झाली नाही.
कन्नडच्या सायगव्हान घाटात दरड कोसळली; पोलीस मित्र, होमगार्डच्या मदतीने रस्ता मोकळा - kannad Gautala Sanctuary News
कन्नड तालुक्यात गौताळा अभ्यारण्यातील सायगव्हान घाटात दरड कोसळली होती. या भागातून वाहन जाण्यास अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने, दरड कोसळली, त्या वेळी येथून वाहन किंवा व्यक्ती जात नसल्याने अपघात अथवा जीवितहानी झाली नाही.

दरड कोसळल्याने वाहने जाण्यास अडथळा येऊन काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घाटातून कन्नड, नागद आणि चाळीसगावकडे जाणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबली होती.
याची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे आणि नागद येथील पोलीस मित्र धावून आले. नागद बीटचे जमादार जे. पी. सोनवणे यांनी स्वखर्चाने जेसीबी लावत हा रस्ता मोकळा केला. त्याच्या या मदतीला पोलीस प्रशासनाचे ठोंबरे, काळे, किरमानी, पोलीस मित्र प्रमोद कुमावत, समाधान पाटील तसेच त्या बीटमधले पोलीस होमगार्ड यांनी कोसळलेली दगड-माती बाजूला केली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.