महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पत्रकाराचे कार्ड गळ्यात घालून दारू विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात

पत्रकाराचे कार्ड गळ्यात घालून दारू विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 62 हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

औरंगाबाद
औरंगाबाद

By

Published : Apr 20, 2021, 5:52 PM IST


औरंगाबाद - बेगमपुरा भागात पत्रकाराचे कार्ड गळ्यात घालून देशी दारू विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खबर्‍याने दिली होती माहिती पुष्कर रामचंद्र आहेरकर (वय 24, रा. मोदी हिल्स, पहाडसिंगपुरा) किसन राजू कुंडारे (वय 23, रा. साई मंदिर बाजूला, न्यू पहाडसिंगपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहे. बेगमपुरा भागात दोन तरुण पत्रकाराचा कार्ड वापरून दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी पुष्कर हा पत्रकार असल्याचे सांगत दादागिरी करू लागला. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवत त्याला ताब्यात घेतले. झाडाझडती घेतली असता दोघेही विदेशी दारू विक्री करत असल्याचे आढळले. यावेळी त्यांच्या ताब्यातून विदेशी दारूच्या बाटल्यांसह स्कुटी, मोबाइल, असा एकूण 62 हजार वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे ,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, मनोज शिंदे, संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान लोटे, विशाल पाटील, आनंद वाहुळ, रितेश जाधव यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details