महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - aurangabad latest crime news

२७ मे रोजी कन्नड येथील नागापूर गावातील एहतेश्याम नासेर काजी यांचे घरासमोर उभे केलेलेट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेली होती. १७ मे रोजी लाडसावंगी येथील रफिक गफूर बागवान यांच्या शेतातून ट्रॅक्टर चोरीला गेले होते.

ट्रॅक्टर चोरणारी टोळी
ट्रॅक्टर चोरणारी टोळी

By

Published : Jun 1, 2021, 12:28 PM IST

औरंगाबाद- घरासमोर शेतात उभे केलेले ट्रॅक्टर चोरी करून परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 लाख 80 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शेख समीर ऊर्फ दादा शेख रज्जाक (२८, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) अमोल भाऊसाहेब खमाट (२५, रा. उमरावती, ता. फुलंब्री) ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञान्या विष्णू धांडे (२४, रा. वडोदबाजार, ता. फुलंब्री) या तिघांना अटक केली आहे.

घरासमोरून ट्रॅक्टर गेले होत चोरी
२७ मे रोजी कन्नड येथील नागापूर गावातील एहतेश्याम नासेर काजी यांचे घरासमोर उभे केलेलेट्रॅक्टर (एमएच २० एफपी २१६५) व ट्रॉली चोरीला गेली होती. १७ मे रोजी लाडसावंगी येथील रफिक गफूर बागवान यांच्या शेतातून ट्रॅक्टर (एमएच २० एबी) चोरीला गेले होते. चोरी गेलेले हे ट्रॅक्टर रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख समीर व त्याचे साथीदारांनी नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून वरील तिघांना अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details