महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक - Two men using fake currency notes in aurangabad

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या २ जणांना गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

aurangabad
बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक

By

Published : Nov 29, 2019, 6:41 PM IST

औरंगाबाद -बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या २ जणांना गंगापूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनावट नोटांचा चलनात वापर करणाऱ्या दोघांना अटक


संतोष विठ्ठल ढवळे (वय -४२, अमळनेर) आणि चंद्रशेखर व्होरा (वय -३८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष ढवळे यांच्याकडून 50 च्या 52 बनावट नोटा, जुन्या 100 च्या 2 बनावट नोटा आणि नवीन 100 च्या 5 बनावट नोटा आशा एकूण 3 हजार 300 रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या. याप्रकरणी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास स. पो. नि प्रल्हाद मुंढे हे करत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details