महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा क्रांती मोर्च्यांच्या समन्वयकांची धरपकड सुरू - औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चा बातमी

मराठा आरक्षण स्थगिती उठवण्याबाबत सुनावणी पुढे ढकलल्याने मराठा क्रांची मोर्चाचे कार्यकर्ते पुन्हा रस्त्यावर उतले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात सकाळपासून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची धरपकड सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.

समन्वयक
समन्वयक

By

Published : Oct 29, 2020, 5:37 PM IST

Updated : Oct 29, 2020, 6:46 PM IST

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या स्थगिती उठवण्याबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने मराठा क्रांती मोर्चा पुन्हा रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. तर आज (दि. 29 ऑक्टोबर) औरंगाबाद शहरात सकाळपासून मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांची धरपकड सुरू असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला आहे.

औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मराठा आरक्षणावरून सरकारच्या भूमिकाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देसाई यांना जाब विचारला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक रमेश केरे यांना ताब्यात घेतले असून, त्यांना पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात नजर कैद केले असल्याचा आरोप केरे यांनी केला आहे.

बोलताना समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा

मराठा क्रांती मोर्च्यांच्या सुरुवात झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटना आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. बिडकीन येथे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद-पैठण रोडवर टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आला होता. त्या अनुषंगाने औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई दौऱ्यावर असताना आंदोलकांनी गैर प्रकार करू नये यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. या करवाईवर मराठा आंदोलक संतप्त झाले असून आमची भीती वाटते का, असा प्रश्न समनव्यक रमेश केरे पाटील आणि रवींद्र काळे यांनी उपस्थित केला. आंदोलकांना त्रास देण्याचे काम पोलीस करत असून आगामी काळात त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात असा इशारा मराठा क्रांती मोर्चा तर्फे देण्यात आला.

हेही वाचा -मराठा आरक्षण आंदोलन प्रकरण : आठ मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

Last Updated : Oct 29, 2020, 6:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details