औरंगाबाद- टपरी व्यावसायिक हत्येप्रकरणातील फरार शेवटच्या आरोपीला पकडण्यात पुंडलिंकनगर पोलिसांना यश मिळाले आहे. सुनिल गणेश राऊत, (२७, रा. चेलीपुरा, काचीवाडा) असे त्या आरोपीचे नाव आहे.
शेळके हत्या प्रकारणातील सहावा आरोपी जेरबंद - पोलीस
गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी असलेल्या दत्तात्रय गंगाराम शेळके यांची १५ एप्रिलला चाकुने हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. जुना वाद व व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलजवळ चहाची टपरी असलेल्या दत्तात्रय गंगाराम शेळके (२८, रा. पुंडलिकनगर, गारखेडा परिसर) यांची १५ एप्रिलला चाकुने हल्ला करुन हत्या करण्यात आली होती. जुना वाद व व्यावसायिक स्पर्धेतून त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येतील सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
यात आतापर्यंत रविशंकर हरिश्चंद्र तायडे (२६, गजानन कॉलनी), अभिजीत चव्हाण ऊर्फ चिक्या (२९, रा. गजानन कॉलनी), सोमेश बरखा रिडलॉन (२२, रा. गांधीनगर), शाम सुरेश भोजय्या (३0, रा. श्रीकृष्णनगर, शहानुरवाडी), अजय दडपे (रा. काचीवाडा) यांना अटक करण्यात आली होती. परंतु, शेवटचा आरोपी सुनिल हा फरार झाला होता. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी शेवटचा आरोपी सुनिला याला शुक्रवारी अटक केली.